नमस्कार मंडळी,
      आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फाँँलो करा. फेसबुक इंस्टाग्राम
    आपले All मराठी वरती स्वागत आहे. मी तुम्हाला या लेखामध्ये ईबूक तयार कसे करावे आणि ते विकून लाखो रुपये कसे कमवावे या विषयी सविस्तर सांगणार आहे. तर तुम्ही हा लेख संपूर्ण वाचा.



ईबूक तयार करण्यासाठी आपल्याला गरज असती ती म्हणजे मोबाईल, कॉम्प्युटर किंवा लँँपटापची आणि त्यासोबत आपल्याला विकण्यासाठी गरज असती ती म्हणजे इंटरनेटची. ह्या गोष्टी आपल्याकडे असतील तर आपण ई बुक तयार करून आणि ते ऑनलाईन विकून लाखो रुपये कमवू शकतो.

  ईबूकसाठी विषय कोणते निवडावे?

ईबूक लिहण्यासाठी विषय निवडणे फार गरजेचे असते. ज्या विषयावरती आपल्याला जास्त माहिती आहे आणि लोकांना हि गरज आहे तो विषय निवडणे फार गरजेचे असते. उदा. उद्योगधंदा कि नोकरी. उद्योगसंधी असे विषय निवडावे. ज्या विषयात आपण परगंत आहे तो विषय निवडावा, जो विषय आपण निवडला आहे त्या विषयावरती आपल्याला किमान २०० ते २५० पाणी ईबूक लिहिता आले पाहिजे. भरपूर विषयावरती आपण ईबूक बनवू शकतो.

  ईबूक कसे तयार करावे?

ईबूक तयार करण्यासाठी आपल्याला MS-WORD मध्ये २०० ते २५० पेज मध्ये माहिती लिहावी लागेल.माहिती बरोबर फोटो आणि रेखाटणे हि असावीत. आज ज्याला मागणी आहे तो विषय निवडावा जसे कि इंस्टाग्राम वरून पैसे कसे कमवावे? या विषयी हि आपण ईबूक तयार करू शकतो. MS-WORD मधील लिहिलेले डॉक्युमेंट PDF मधी Save करावी. आता आपले ईबूक तयार झालेले असेल. ईबूक तयार झाले कि आपण त्याला विकले तरच आपण पैसे कमवू शकतो.

       Instamojo वरती फ्री मध्ये स्टोर कसे बनवावे?

      instamojo वरून फ्री मध्ये ईबूक स्टोर कसे बनवावे, विषयी जाणून घेवूया. प्रथम आपल्याला खालील लिंकवर क्लिक करायचे आहे.
      Instamojo sign up   

लिंकवर क्लिक केल्यावर खालील पेज ओपन होईल त्यानंतर Sign up for Free वरती क्लिक करावे.


Sign up for Free वरती  क्लिक केल्यावर तुम्हाला खालील पेज ओपन होईल

  त्यामध्ये तुम्हाला तुमचा ईमेल Id भरायचा आहे. त्या नंतर तुम्हाला पासवर्ड टाकायचा आहे तुम्हाला तुमच्या ई मेलचा पासवर्ड न टाकता दुसरा पासवर्ड तयार करायचा आहे. पासवर्ड मध्ये कॅपिटल लेटर तसेच स्माल लिपीतील लेटर असावे. उदा. Vivek@123 त्यानंतर Have a referral code? वरती क्लीक करावे. आणिTECHATULd77f हा  refer code टाकावा.आणि sign up as business वरती क्लिक करावे. ई मेल वरती Activation लिंक येईल. त्यावरती क्लिक करावे आणि तुमचे अकाऊंट Activate होईल.अकाउंट activate झाल्यावर sign in वरती क्लिक करावे.  तुम्ही टाकलेला ई-मेल आयडी आणि पासवर्ड नि लॉगिन करायचे आहे

   Instamojo वरती आपले प्रोडक्ट म्हणजेज ईबूक कसे अँँड करावे? 


     




















       प्रॉडक्ट अँड करण्यासाठी तुम्हांला Products and store वर क्लिक करावे लागेल क्लिक केल्यावर तुम्हांला अँड प्रॉडक्ट वरती क्लिक करावे.त्यानंतर डिजिटल प्रॉडक्ट वरती क्लिक करावे. डिजिटल प्रोडक्ट वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुम्ही जे ईबूक सेव केले होते ते अपलोड करायचे आहे. PDF  अपलोड केल्यानंतर   टायटल ( शीर्षक ) डिस्क्रिप्शन (वर्णन) मोजक्या शब्दात द्यायचे आहे. ते दिल्यानंतर  रक्कम  टाकायची आहे. रक्कम भरल्यानंतर ईबूक चे योग्य असे दोन ते तीन फोटो अँड करायचे आहेत. फोटो अँड केल्यानंतर  ऍडव्हान्स सेटिंग वर क्लिक करावे त्यांनतर SEO  फ्रेंडली टायटल डिस्क्रिप्शन द्यायचे आहे आणि Add Product To Store या बटनावर क्लिक करावे. तुमचे ईबूक विकण्यासाठी तयार असेल.

      Instamojo ला बँक अकाऊंट आणि पँन कार्ड कसे अँँड करावे?

  आता आपण instamojo ला बँक अकाऊंट कसे जोडावे या विषयी जाणून घेवूया. कारण आपण सर्व काही पैसा कमावण्यासाठीच करतो. बँक अकाऊंट जोडण्यासाठी sign in करताना तुम्हाला पन कार्ड आणि अकाऊंट ची माहिती अचूक भरायची आहे. नंतर E-KYC करताना पन कार्ड आणि बँक स्टेटमेंट अपलोड करावे लागते. 

   ईबूक कसे विकावे? 


         ईबूक विकण्यासाठी आपल्याला गरज आहे ती म्हणजे सोशेल मीडियाची.  आपण whatsapp, facebook Instagram आणि twiter च्या माध्यमातून आपले ईबूक लाखो लोकापर्यत पोहोचवू शकतो आणि विक्री करू शकतो.


हा लेख आवडल्यास सोशेल मिडिया वरती शेअर करा. आणि आमच्या Facebook page ला लाईक करा [Facebook Page]. फ्री मध्ये टेलेग्राम आणि व्हाट्सअप्प Newsletter ला जॉईन होण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा.
[TelegramNewsletter]: https://t.me/allmarathimedia

[What'sappNewsletter]https://bit.ly/whatsappallmarathi